Ad will apear here
Next
‘बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने नकोत’
राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात डॉ. अश्विनी धोंगडे यांचे प्रतिपादन


पुणे : ‘अनुभवातून लिहिलेले साहित्य कसदार असते. स्त्रियांनी आपल्या अनुभवांवर आधारित साहित्य निर्माण केले पाहिजे. बाईचा माणूस म्हणून विचार होण्यासह त्यांना मुक्तपणे लिहिता आले पाहिजे; मात्र आज बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने आहेत. स्त्रियांनी भाषेवरील ही पुरुषी बंधने झुगारून कसदार साहित्य निर्मिती केली पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.

भोसरी येथील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यात ‘स्त्रीवादी साहित्य : काल, आज उद्या’ या विषयावर डॉ. धोंगडे बोलत होत्या. या वेळी आकांक्षा प्रतिष्ठानच्या संचालिका राणी चौरे व पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मोहिनी लांडे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, तर शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रा. बाजीराव गायकवाड व कलांगण कला संस्थेचे सचिन घटने यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. अशोककुमार पगारिया, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. धोंगडे म्हणाल्या, ‘समाजात स्त्री आणि पुरुषांच्या लेखनात फरक जाणवतो. पुरुषांनी स्त्रियांच्या शरीराचे वर्णन केले, तर ते उत्तम साहित्य बनते; पण स्त्रियांनी शरीराचे वर्णन केल्यास त्या लेखनाला अश्लील समजले जाते, हे अयोग्य आहे. स्त्रीवाद हा स्वतःच्या जगण्यातून साहित्यात उतरला जातो. आत्ताच्या स्त्रियांचा लेखनावर विश्वास राहिला नाही. मोकळे होणे ही साहित्याची गरज आहे. साहित्य दु:खातून, नैराश्यातून निर्माण होते आणि ती आजच्या पिढीतील स्त्रियांनी जपले पाहिजे.’

लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या साहित्यिकाने आपल्या लेखणीतून सुधारणेचा विचार मांडला. आजच्या साहित्यात समाज सुधारणेचा विचार रुजला पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारची वैचारिक संमेलने उपयुक्त ठरतील. त्यामुळे बंधुतेचा विचार घेऊन साहित्यनिर्मिती झाली, तर समाजात बंधुभाव वाढेल. समाजाला जोडणारी माणसे आपल्यासमोर आणून त्यांचा सत्कार करण्याचे काम बंधुता परिवार करीत आहे, याचा आनंद वाटतो.’

तत्पूर्वी ‘काव्यपंढरी’ हे कविसंमेलन रंगले. प्रतिभावान कवींनी आपल्या कवितेतून समाजात बंधुभाव रुजविण्याचे विचार मांडले. या वेळी संतोष घुले यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, तर दीप पारधे यांना ‘लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संगीता झिंझुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZVYBW
Similar Posts
सावित्रीबाईंनी दिला समाजातील महिलांना सन्मान, आवाज पुणे : ‘जेव्हा समाजामध्ये स्त्रीकडे एक भोगवादी वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता, स्त्रियांसाठी शिक्षणाचे सर्व मार्ग बंद होते, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांना सामाजिक प्रवाहात आणले. स्त्रियांचा आवाज बनून त्यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला
‘समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न’ पुणे : ‘संत गाडगेबाबा हे कृतीशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या
‘जागतिक महिला दिन हा आत्मचिंतनाचा दिवस’ पुणे : ‘जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मीडियावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे,’ असे मत डॉ
‘समाज परिवर्तनासाठी बंधुता अत्यंत आवश्यक’ पुणे : ‘संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती,धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती,धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती,धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. समाजात परिवर्तन घडवायचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language